मिरवणूक नसल्याने पोलिसांचा ताण कमी; तरी राहणार कडेकोट बंदोबस्त

Foto
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या होणारे गणेश विसर्जन अत्यन्त सोप्या पद्धतीने साजरा होणार असून विसर्जन मिरवणूक रद्द करण्यात आल्याने पोलिसांवरील ताण कमी झालं आसला तरी उद्या काही अनुचित प्रकार घडू नये या साठी शहरातील चौक-चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.
सर्वांच्या लाडक्या गणरायाचे विसर्जन अवघ्या काही तासावर आले आहे.दरवर्षी शहरात गणरायाला निरोप देण्यासाठी भव्य विसर्जन मिरवणूक काढली जाते.या मिरवणुकीत लाखो भाविकांचा सहभाग असतो मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने जुन्या नवीन शहरातील गणेश महासंघ तसेच मनाचा समजल्या जाणार्‍या शहराचे आराध्य दैवत संस्थान गणपती ट्रस्ट ने देखील मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे.तर मनपाच्या वतीने गणेश मूर्ती संकलित केली जाणार असून त्यासाठी 27 ठिकाणी विसर्जनाची जागा निश्चित करण्यात आली आहे. दरवर्षी मिरवणुकी दरम्यानचा पोलिसांवरील ताण कमी होणार आहे.तरी देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक मुख्य ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.शिवाय पेट्रोलिंग, फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे, तर एस.आर.पी.एफ.च्या तुकड्या,होमगार्डसह पोलीस ठाणे स्थरावर चौकाचौकात पोलीस तैनात राहणार आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker